२ नोव्हेंबर रोजी हॅरिस शिल्डच्या पहिल्या फेरीत सेंट जोसेफ्स हायस्कूल, डोंबिवलीने सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूलचा ४८४ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. आझाद मैदानावर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना सेंट जोसेफ्स हायस्कूल, डोंबिवलीने २८६ धावा केल्या. सलामीवीर विहान वाघ लवकर बाद झाल्यानंतर कर्णधार आयुष आंबेकर आणि तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा...