आदेश भावोजी 99 वर्षीय चाहतीच्या भेटीला; पैठणी देऊन आजीबाईंचा सन्मान

PHOTO : आदेश भावोजी 99 वर्षीय चाहतीच्या भेटीला, पैठणी देऊन आजीबाईंचा सन्मान

महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकर यांनी आपल्या खास शैलीनं अनेकांचं प्रेम मिळवलं आहे. त्यापैकीच एक म्हणजे सांगलीत राहणाऱ्या नलिनी जोशी

PHOTO : आदेश भावोजी 99 वर्षीय चाहतीच्या भेटीला, पैठणी देऊन आजीबाईंचा सन्मान

99 वर्षांच्या या आजीबाईंची आदेश बांदेकर यांनी सांगलीतील घरी जाऊन भेट घेतली

PHOTO : आदेश भावोजी 99 वर्षीय चाहतीच्या भेटीला, पैठणी देऊन आजीबाईंचा सन्मान

गेली पाच सहा वर्ष नलिनी आजी आदेश बांदेकर यांना गाणी ऐकवतात. दररोज संध्याकाळी होम मिनिस्टर ही मालिका सुरु होणाच्या आधी त्या टीव्ही समोर खुर्ची टाकून बसतात. सहा वाजता कार्यक्रम सुरु झाला की आदेश बांदेकर यांनी बघून रोज एक गाणं म्हणतात.

PHOTO : आदेश भावोजी 99 वर्षीय चाहतीच्या भेटीला, पैठणी देऊन आजीबाईंचा सन्मान

त्यांची अशी धारणा आहे की आदेश बांदेकरही त्यांचं गाणं ऐकतात. काही दिवसांपूर्वी आजीच्या गाण्याचा व्हिडीओ पाहून आदेश बांदेकर यांनी त्यांचं कौतुक करण्यासाठी सांगलीला येण्याचं आश्वासन दिलं होतं.

आज या आजींनी 99 वर्ष पूर्ण करुन 100 व्या वर्षात पदार्पण केलं. त्याच निमित्ताने आदेश बांदेकर यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. या खास प्रसंगी आदेश बांदेकर यांनी आजीबाईंना पैठणी भेट दिली. या दोघांसाठीही हा अत्यंत भावूक क्षण होता.

PHOTO : आदेश भावोजी 99 वर्षीय चाहतीच्या भेटीला, पैठणी देऊन आजीबाईंचा सन्मान

वय वर्ष 99 असताना सुद्धा सांगलीच्या नलिनी जोशी यांनी गाण्याची गोडी जपली आहे. नाट्यगीते भक्तिगीते, भावगीते जोशी आजी अतिशय सुरेल आवाजात म्हणून दाखवतात.

साक्षात आदेश बांदेकर यांना पाहून आजींना आश्चर्य वाटलंच, शिवाय त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हास्य आणि समाधान झळकलं. यावेळी आदेश बांदेकर यांच्या गळ्यात पडून आजीबाईंची आपला आनंद व्यक्त केला.

आदेश बांदेकर यांनी आजींच्या शंभराव्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थिती त्यांना पैठणी भेट देत मनसोक्त गप्पाही मारल्या.

PHOTO : आदेश भावोजी 99 वर्षीय चाहतीच्या भेटीला, पैठणी देऊन आजीबाईंचा सन्मान

यावेळी बोलताना आदेश बांदेकर यांना त्यांच्या आईची आठवण आली आणि या आठवणीने बांदेकर यांचे डोळे पाणावल्याने संपूर्ण वातावरण गहिवरुन गेले.

PHOTO : आदेश भावोजी 99 वर्षीय चाहतीच्या भेटीला, पैठणी देऊन आजीबाईंचा सन्मान