ठाण्याच्या भास्कर्स पुरणपोळीने खवय्यांची जिंकली मने
ठाणे : पारंपारिक पुरणाच्या पोळीला जरा हटके स्वरूप देऊन त्याला खवय्यांच्या पसंतीस उतरवण्यासाठी देशभरात 40 शाखा असलेल्या पुरणपोळी घराला त्यांच्या चवीमुळे अनोखा किताब मिळाला आहे. ठाण्यातील पाचपाखाडी परिसरात काही वर्षांपूर्वी पुरणपोळीसाठी प्रसिद्ध झालेल्या ‘भास्कर्स पुरणपोळी घर’ ने अवघ्या ठाणेकरांचीच नव्हे तर राज्यात आणि देशातही खवय्यांची मने जिंकली आहेत.
नुकताच अंबानींचा शाही विवाह सोहळा पार पडला. त्या शाही विवाह सोहळ्यात भास्कर्स पुरणपोळी घराच्या पुरणपोळीनं अंबानी कुटुंबीयांचे आणि मित्र परिवाराचे लक्ष वेधले. गुढीपाडव्यानिमित्ताने पुरणपोळी घरामध्ये खाद्यप्रेमींनी तुबंड गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. भास्कर्स पुरणपोळी घराशी संवाद साधल्यानंतर त्यांनी सांगितले की, 24 विविध प्रकारच्या फळांच्या आणि सुक्या मेव्याचे पुरणपोळींचे प्रकार आहेत. मावा पुरणपोळी, बदाम पुरणपोळी, डायफ्रुट पुरणपोळी आणि विशेष म्हणजे फणस पुरणपोळीचा सध्या सिझन असून, लोकांना ती फार आवडते. गुढीपाडव्याच्या निमित्ताने वर्ल्ड रेकॉर्ड ॲाफ इंडिया यांनी पुरणपोळींची दखल घेऊन वर्ल्ड रेकॉर्ड बुक ॲाफ इंडियाचा किताब बहाल केला आहे.
पुरणपोळी या वेगवेगळ्या फळांपासून बनविल्या जातात. खरं तर या ठिकाणी नागरिकांना गरमागरम पुरणपोळी खायला मिळते, इथे तयार होणाऱ्या पुरणपोळीमध्ये कोणत्याही प्रकारचे केमिकल वापरले जात नाही. नैसर्गिक चव मिळत असल्याने या भास्कर्स पुरणपोळी घराकडे खाद्यप्रेमींचा कल वाढत आहे.
या 24 प्रकारच्या पुरणपोळ्या आणि यांची ख्याती ऐकून अंबानींच्या शाही विवाह सोहळ्यात या 24 प्रकारच्या पुरणपोळींचा आस्वाद अनेक कलाकारांनी घेतला होता. जॉन सीना आणि रजनीकांत यांना खास नारळाची पुरणपोळी फार आवडली होती, यासोबत फणस आणि सुका मेवा असलेली पुरणपोळी अनेकांना आवडत आहे.