झी मराठीवर येत्या रविवारी मन झालं बाजींदचा एक तासाचा विशेष भाग आणि जल्लोष २०२२

प्रेक्षकांचं मनोरंजन हे आठवड्यातील काही वारांपुरतीच मर्यादित राहिलं नसून झी मराठीवर प्रेक्षकांना अविरत मनोरंजनाची हमी मिळते. येत्या रविवारी झी मराठी आपल्या प्रेक्षकांसोबत मोठ्या जल्लोषात २०२२ या नवीन वर्षाचं स्वागत करणार आहे तसंच प्रेक्षकांची आवडती मालिका मन झालं बाजींद या मालिकेचा महाएपिसोड देखील पाहायला मिळणार आहे.
‘मन झालं बाजिंद’ या मालिकेवर आणि त्यातील व्यक्तिरेखांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. कृष्णा आणि राया हि जोडी देखील प्रेक्षकांची अगदी आवडती जोडी बनली आहे. मात्र मालिकेत आता एक नवा ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे. गुरुजींनी सांगितलेलं भाकीत अखेर खरं ठरणार आहे. कारण राया आणि कृष्णा यांच्या फोटोला हार पाहून तर हेच स्पष्ट होत आहे.
झी मराठीने त्यांच्या अधिकृत इनस्टावर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये राया आणि कृष्णाच्या फोटोला फुलांचा हार दिसत आहे. हा फोटो शेअर करत म्हटलं आहे की, गुरुजींनी सांगितलेलं भाकीत अखेर खरं ठरणार आहे. कारण राया आणि कृष्णा…यावरून मालिकेत या दोघांचा मृत्यू होणार आहे का असा प्रश्न सर्वांना पडणार आहे. यावरून एकच दिसते की मालिकेत लवकरच मोठा ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे. त्यामुळे पाहायला विसरू नका मन झालं बाजींद या मालिकेचा १ तासाचा विशेष भाग रविवार २ जानेवारी संध्याकाळी ७ वाजता.

२०२१ हे वर्ष सगळ्यांसाठीच खूप कठीण होतं. आता या वर्षाला निरोप देऊन जल्लोष २०२२ हा खास कार्यक्रम प्रेक्षकांसाठी सादर करून नवीन वर्षाचं स्वागत झी मराठीवाहिनी मोठ्या उत्साहात करणार आहे. हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानीच असणार आहे. संगीतमय आणि विनोदाने भरलेली नवीन वर्षातील संध्याकाळ प्रेक्षकांचा ताण दूर करून त्यांचं भरभरून मनोरंजन करेल. त्यामुळे पाहायला विसरून नका जल्लोष २०२२ रविवार २ जानेवारी रात्री ८ वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.