महापालिका मुख्यालयातील रांगोळीत देशाच्या प्रगतीचा आढावा

ठाणे : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ठाणे महापालिका मुख्यालयात तळमजल्यावर रांगोळी रेखाटण्यात आली आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, गेल्या ७५ वर्षात देशाने निरनिराळ्या क्षेत्रात केलेली प्रगतीचे काही टप्पे रेखाटण्यात आले आहेत.

आज सकाळी ठाणे महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी भेट देऊन रांगोळीकार संजीवनी शैलेंद्र जाधव आणि त्यांची कन्या जान्हवी जाधव यांचे कौतुक केले. ठाणे महापालिकेच्या मुख्यालयात प्रवेश केल्यानंतर प्रवेशद्वारावरच ही भव्य रांगोळी काढण्यात आली आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे बोधचिन्ह साकारण्यात आले आहे.

ही रांगोळी साकारणाऱ्या संजीवनी जाधव या ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक ९८ मध्ये शिक्षिका आहेत. जान्हवी जाधव या इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीरिंग शाखेच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. या रांगोळीचे सर्वांकडून कौतुक होत आहे.