ठाणे : शहरातील कोरोना रुग्णांचा आकडा पुन्हा एकदा कमी झाला असून आज अवघा एक नवीन रूग्ण सापडला आहे तर दोन रूग्ण रोगमुक्त झाले आहेत. रुग्णालयात फक्त एका रुग्णावर उपचार सुरू आहे.
महापालिका हद्दीत माजिवडे-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात एक रूग्ण सापडला आहे. उर्वरित आठ प्रभाग समिती भागात एकाही नवीन रुग्णाची नोंद झाली नाही. विविध रुग्णालयात आणि घरी उपचार सुरू असलेल्या रूग्णांपैकी दोन रूग्ण रोगमुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत एक लाख ८१,५७४जण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत तर रुग्णालयात एक आणि घरी ४३ रुग्ण अशा एकूण ४३जणांवर उपचार सुरू आहेत. आज एकही रूग्ण दगावला नसून आत्तापर्यंत २,१३०जणांचा मृत्यू झाला आहे.
महापालिका प्रशासनाने काल शहरातील १९५ नागरिकांची चाचणी घेतली होती. त्यामध्ये एक जण बाधित मिळाला आहे. आत्तापर्यंत २४ लाख १०,५३९ ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये एक लाख ८३,७४८ रूग्ण बाधित सापडले आहेत.