ठाण्यात कोरोनाचे नवीन अवघा एक रुग्ण

ठाणे : शहरातील कोरोना रूग्णवाढ तळाशी आली आहे तर एक जण कोरोनामुक्त झाला आहे. रुग्णालयात अवघा एक रूग्ण उपचाराधीन आहे.

महापालिका हद्दीतील उथळसर प्रभाग समिती क्षेत्रात एक रूग्ण सापडला आहे. उर्वरित आठ प्रभाग समिती परिसरात एकाही रुग्णाची नोंद झाली नाही. पार्किंग प्लाझा येथे एका रुग्णावर उपचार सुरू आहे तर ११ जणांवर घरी उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत एक लाख ८१,५४३जण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. आज एकही रूग्ण दगावला नसून आत्तापर्यंत २१२७जणांचा मृत्यू झाला आहे.

महापालिका प्रशासनाने काल शहरातील ५३३नागरिकांची चाचणी घेतली. त्यामध्ये एक जण बाधित मिळाला आहे. आत्तापर्यंत २४ लाख ५,३२८ ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये एक लाख ८३,६८२ जण बाधित सापडले आहेत.