धान्याच्या गोण्या अंगावर पडून मजुराचा मृत्यू

ठाणे : धान्याच्या गोण्या अंगावर पडून एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पंचगंगा राबोडी येथील दुकानात घडली आहे.

संजय गुप्ता असे या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या मजुराचे नाव आहे. राबोडी पंचगंगा येथे अशानंद जैस्वाल यांचे १०बाय१०चे शिधावाटप दुकान आहे. या दुकानात १०० ते १२५ धान्याच्या गोण्या अंदाजे पाच टन माल होता. आज संध्याकाळी ५.१५च्या दरम्यान संजय गुप्ता हे काम करत असताना  या गोण्या त्याच्या अंगावर पडल्या. त्याखाली तो दबला होता. या बाबतची माहिती ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळाल्यानंतर या पथकाने त्या मजुराला बाहेर काढून त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्याला मृत घोषित करण्यात आले.या घटनेची राबोडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.