अयोध्येत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे होर्डींग झळकले

समर्थक ठाणेकरांचा पुढाकार

ठाणे : श्रीराम मंदिर सोहळ्यासाठी अयोध्यानगरी सज्ज झाली आहे. अयोध्येत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे होर्डींग जागोजागी झळकत असून याकामी ठाण्यातील त्यांच्या समर्थकांनी पुढाकार घेतला आहे.

ठाण्यातील विकास दाभाडे तसेच बाळा आणि रीना मुदलियार या दांपत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या स्वागतार्थ मंदिराकडे जाणाऱ्या प्रमुख 36 रस्त्यांवर बॅनर आणि होर्डिंग्ज उभारले आहेत, त्यामुळे अयोध्येत मुख्यमंत्र्यांचा बोलबाला दिसून येत आहे.

सोहळ्यानिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या स्वागतासाठी 36 होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. होर्डिंग्जवर अयोध्येतील मंदिरासह प्रभू श्रीरामाचे छायाचित्र पाहण्यास मिळत आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत आनंद दिघे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगीनाथ, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार यांच्या छायाचित्रासह शिंदे पिता-पुत्रांचेही छायाचित्र पाहण्यास मिळत आहे.