नाताळ खरेदीला रंगत : ठाण्यात ‘नाताळ स्पेशल’ भव्य प्रदर्शन

ठाणे: ठाणेकरांसाठी यंदाच्या नाताळच्या खरेदीला खास रंगत मिळणार आहे. युनिव्हर्सल ट्रेड एक्सपो आयोजित ‘नाताळ स्पेशल’ भव्य प्रदर्शन आणि विक्रीचे आयोजन 21 डिसेंबर ते 26 डिसेंबर 2024 या कालावधीत घंटाळी मैदान, ठाणे पश्चिम येथे करण्यात आले आहे. हे प्रदर्शन सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत खुले राहणार आहे.

या प्रदर्शनात ठाणेकरांसाठी नवनवीन आणि आकर्षक वस्तूंची रेलचेल आहे. यात 70 हून अधिक स्टॉल्समध्ये 1000 पेक्षा जास्त प्रकारच्या वस्तू उपलब्ध आहेत. यामध्ये पारंपरिक साड्या, डिझायनर ब्लाउज, कुर्ती, दागिने, मसाले, लोणची, स्नॅक्स, स्वयंपाकघरातील उपयुक्त वस्तू, शोभेच्या वस्तू, होम डेकोर अशा विविध प्रकारांचा समावेश आहे.

या प्रदर्शनाचे खास वैशिष्ट्य म्हणजे प्रदर्शनामध्ये खरेदीसह लकी ड्रॉ ची मजा ठाणेकरांना अनुभवता येईल. दररोज आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. यामुळे प्रदर्शन अधिकच खास ठरणार आहे. यात प्रत्येक वस्तू ही  किफायतशीर दरामध्ये मिळणार आहे. सर्व ठाणेकरांनी या प्रदर्शनाला भेट देऊन खरेदीचा आनंद घेत, आगामी उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी  या भव्य प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन अमित गोडबोले आणि सरिता सोमण यांनी कंपनी युनिव्हर्सल ट्रेड एक्स्पोतर्फे केलेले आहे.