ठाणे : श्री साईनाथ सेवा समिती वर्तकनगर ठाणे येथील सुवर्णमय साई मंदिरामध्ये गुढीपाडवा या मराठी नववर्षानिमित्त एका साईभक्ताने श्री साईबाबांना 250 ग्रॅमचा सोन्याचा मुकुट अर्पण केला.
या सोन्याच्या मुकुटाची विधीवत पुजा करून शुभदिनी सोन्याचा मुकुट श्री साईबाबांना परिधान करण्यात आला. त्यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बळीराम नईबागकर, कार्याध्यक्ष मंगेश नईबागकर, उपाध्यक्ष नंदकुमार साळवी, अशोक हिरानंदानी, सचिव सुरेश महाडिक, सह सचिव विकास झगडे, खजिनदार बबन बोबडे, विश्वस्त अशोक सुर्वे, हरी माळी, प्रवीण रोठे, अपर्णा जाधव, साईभक्त सेवेकरी मिलिंद नईबागकर, विलास मोडक, महेश सुळे, राजन खानोलकर, दिलीप देसाई, सुनील गवई, मंगेश पाटेकर, उमेश नाईक, सतीश तावडे, अनंत देशमुख, अजित देसाई, संजय राणे, अमर पवार, जितेश कुलकर्णी त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात साईभक्त उपस्थित होते.
नूतनवर्षी साई मंदिरास सुवर्ण मुकुट देणाऱ्या साईभक्तास संस्थेच्या कार्याध्यक्षांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.