दिव्यात चार जणांच्या टोळक्याने केली एकाची हत्या

आरोपींमध्ये ठाकरे गटाचा शाखाप्रमुख?

ठाणे : दिव्यात चारजणांच्या टोळक्याने एका व्यक्तीची हत्या केल्याची घटना घडली आहे. अटक आरोपींमध्ये ठाकरे गटाचा साबे गाव येथील शाखा प्रमुख असल्याचे कळते.

दिवा येथील बी.आर. नगर येथे सिद्धार्थ बौध्द विहाराजवळ एका व्यक्तीला चार आरोपींनी कोणत्यातरी कठीण हत्याराने आणि लाथा-बुक्क्याने जबर मारहाण करत आहे, अशी माहिती पोलिसांना फोनवरून देण्यात आली. रिक्षाचालक नागराज पलानी यांच्या रिक्षातून त्याला बुद्ध विहारमागील परिसरात झाडे-झुडुपांमध्ये टाकून पलायन केले आहे, असे साक्षीदाराने सांगितले.
ही घटना तक्रारदाराने कळवली असता पोलिसांनी घटनास्थळी त्वरीत धाव घेतली. आरोपींनी केलेल्या मारहाणीत या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.

मुंब्रा पोलिसांनी तडकाफडकी तपासाची चक्रे फिरवली आणि रितेश राजभर, सुलतान शेख, शरद भोईर, जितेश भोईर, आरोपी एक ते तीन ताब्यात घेतले आहे. यातील एक आरोपी जितेश भोईर हा ठाकरे गटाचा साबे गाव येथील शाखा प्रमुख असल्याचे बोलले जाते. महत्वाचे, सुलतान पोलिसांना आकस्मिक मृत्यूची खोटी माहिती देत करण्याचा प्रयत्न करत होता. त्याला संशयावरुन पोलीसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने गुन्हा कबूल केला आहे.

गुन्हयाचा पुढील तपास मुंब्रा पोलीस ठाण्याचे निरीक्षक पाचोरकर करत आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न नाही. परिस्थिती शांत आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी सांगितले.