ठाणे : शौचास गेलेला पाच वर्षांचा चिमुकला तोल जाऊन खाडीमध्ये पडल्याने त्याचा मृत्यू झाला. रुद्र आदमाने असे या बालकाचे नाव असून गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास गायमुख खाडी परिसरात ही घटना घडली.
तो गायमुख खाडीत पडल्याची माहिती मिळताच, घटनास्थळी कासारवडवली पोलीस, आपत्ती व्यवस्थापन विभाग व अग्निशमन दलाचे जवान १ रेस्क्यू वाहनासह व १ बाईक ॲम्बुलन्ससह दाखल झाले. त्या मुलाला खाडीमधून बाहेर काढून उपचारासाठी ओवळा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.