स्वातंत्र्यदिनी निघणार बाईक रॅली

ठाणे : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ठाणे महापालिकेच्या सहकार्याने शहरात ‘उत्सव 75 ठाणे’ साजरा होत आहे. या उत्सवानिमित्त स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्ट 2022 रोजी बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत शेकडो बायकर्स एक संदेश घेऊन मोठी यात्रा करणार आहेत.

‘वाहन चालवताना बाळगण्याची सुरक्षितता’ असा विषय घेऊन हे बायकर्स सकाळी 6 वाजता कल्पतरू पार्कसाईड, ढोकाळी इथून निघून शहरातील चार ऐतिहासिक तलावांच्या बाजूने सफर करत दादा कोंडके अॅम्पीथिएटरपर्यंत येणार असून तिथेच या रॅलीच्या सांगता होईल.

शहरातील बाईक, स्कूटर, इलेक्ट्रिक स्कूटर, असे कोणतेही वाहन घेऊन अधिकाधिक नागरिकांनी या रॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन ‘ठाणे महानगरपालिका व उत्सव75’ ठाणे समितीने केले आहे.

या अनोख्या बाईक रॅलीचे आयोजन R4C म्हणजे ‘राईड फॉर कॉज’ या संस्थेने केले आहे. बाईक रॅलीत सहभागी होण्यासाठी राजीव शहा 9820186977 निकिता राहाळकर 9930009066 यांना या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.