ठाण्याच्या हिरकणीने सर केला २०० फुटाचा डांग्या सुळका

४० अंश तापमान आणि ९० अंशात चढाई

ठाणे : रखरखत्या उन्हात, ४० अंश तापमानात ठाण्याच्या अवघ्या नऊ वर्षांच्या ग्रिहिथाने नाशिक येथील २०० फूट उंच डांग्या सुळका हातोहात सर केला.

7 एप्रिल पहाटे 6.30 वाजता शिरसाठे या बेस विलेज येथून ग्रीहिताने चढाईला सुरुवात केली. सुमारे एक तासाच्या पायपीटीनंतर तिने सुळक्याचा पायथा गाठला.
सुळक्याची पूजा करून थोडा वेळ विश्रांती घेऊन मग सुरक्षेची साधने परिधान करून तिने चढाई सुरू केली.

घामाने भिजून निघालेल्या ग्रिहिथाने एक तासाच्या चढाईनंतर सुळक्याचे टोक गाठले आणि टोकावरून अभिमानाने भगव्या ध्वज फडकवला.

ग्रिहिथाच्या या मोहिमेत ग्रिहिथाचे वडील सचिन विचारे आणि सुप्रसिद्ध, टीम महादुर्ग ॲडव्हेंचरचे अक्षय जमदारे, हृषिकेश बापरडेकर, कल्पेश बनोटे, नितेश पाटील, सद्दाम वणवरी, खुशाल बेंद्रे, वैभव मंचेकर व अश्विनी चौधरी यांनी मोलाची साथ आणि तांत्रिक मदत पुरवली.

या आधी ग्रिहिथाने आंतरराष्ट्रीय पातळीवरचे जगातील सर्वात उंच शिखर माउंट किलीमांजारो आफ्रिका, नेपाळमधील माऊंट एव्हरेस्ट बेस कॅम्प मलेशिया येथील माउंट किनाबालु शिखर तसेच सह्याद्रीतील वजीर सुळका, नवरा-नवरी सुळका, स्कॉटिश कडा, कळकराई सुळका असे अनेक कठीण ट्रेक यशस्वी केले आहेत.