उल्हासनगर : उल्हासनगर कॅम्प नंबर 5 येथील नेहरूनगर परिसरात मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका 17 वर्षीय मुलाला विजेचा शॉक लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण उल्हासनगरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
शिवपूजन हा 17 वर्षीय मुलगा कॅम्प नंबर 5 परिसरात राहत होता. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास शिवपूजन हा पाणी भरत असताना त्याला अचानक विजेचा शॉक बसला. त्याला ताबडतोड उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हिललाईन पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.