कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजतर्फे आंतरमहाविद्यालयीन रील स्पर्धा
ठाणे : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, ठाणे यांच्या वतीने आंतरमहाविद्यालयीन रील मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
‘आय एम रिस्पॉन्सीबल जेन झी, माय कंट्री माय कमिटमेंट’ या विषयावर आधारित या स्पर्धेत तरुणाईला देशप्रेम, सामाजिक जबाबदारी आणि राष्ट्राप्रती असलेली बांधिलकी सर्जनशील पद्धतीने मांडण्याची संधी मिळणार आहे.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी ३० ते ६० सेकंदांची रील तयार करणे आवश्यक असून, ती व्हर्टिकल (९:१६) स्वरूपात आणि एमपी ४ फॉरमॅटमध्ये असावी. रीलमध्ये कोणत्याही एडिटिंग ॲपचे वॉटरमार्क, लोगो, कॅपकट, इनशॉट, कॅनव्हा किंवा युजरनेम दिसता कामा नये. तसेच कोणत्याही प्रकारचा वादग्रस्त किंवा विवाद निर्माण करणारा मजकूर अथवा आशय नसावा, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
स्पर्धेसाठी प्रत्येक महाविद्यालयातून जास्तीत जास्त पाच प्रवेशिका स्वीकारल्या जाणार आहेत. प्रवेशिका निश्चित विषयाशी संबंधित असणे बंधनकारक असून, प्रत्यक्ष ठिकाणी प्रवेशिका स्वीकारल्या जाणार नाहीत. नियम व तांत्रिक मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवेशिका अपात्र ठरविण्यात येतील.
स्पर्धकांनी आपली रील स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करून @kbpcollegethane या अकाउंटला टॅग करावे आणि कोलॅबोरेशनसाठी विनंती करावी. तसेच #GenZCommitmentKBP हा हॅशटॅग वापरणे आवश्यक आहे.
रील सादर करण्याची अंतिम मुदत बुधवार १२ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. स्पर्धेचे स्क्रीनिंग व पारितोषिक वितरण समारंभ गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून गडकरी रंगायतन, ठाणे (प.) येथे होणार आहे.
स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी विद्यार्थी प्रतिनिधी रुपेश प्रजापती ९१३६३०७३४४ आणि आदित्य यादव ९०७६४२६०६६ यांच्याशी संपर्क साधता येईल. स्पर्धेतील शंका व माहितीसाठी आयोजकांनी व्हॉट्सॲप ग्रुपची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे.