ठाणे: अर्पण फाउंडेशनच्या अध्यक्षा भावना डुंबरे यांच्या पुढाकाराने आयोजित मतदार यादी विशेष सखोल पुनर्निरीक्षण उपक्रमांतर्गत मतदार नोंदणी व दुरुस्ती शिबिरात आमदार निरंजन डावखरे यांनी उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधला.
या प्रसंगी ठाणे महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक मनोहर डुंबरे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभत आहे. लोकशाही प्रक्रियेत प्रत्येक नागरिकाचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून, अशा उपक्रमांमुळे मतदार नोंदणीबाबत जागरूकता वाढण्यास आणि अधिकाधिक नागरिकांना मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन मिळते, असे आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितले.