दि कुर्ला नागरिक सहकारी बँकेचे अमृत महोत्सवी वर्ष

ठाणे : दि कुर्ला नागरिक सहकारी बँकेचा सांगता समारंभ व स्मरणिका प्रकाशन सोहळा शनिवार 13 डिसेंबर 2025 रोजी कुर्ला येथील बंटस सभागृह येथे मोठ्या उत्साहात झाला.
याप्रसंगी बोलताना माजी खासदार आनंदराव अडसुळ यांनी सांगितले की, गेल्या 75 वर्षांपासून बँक जनतेची प्रामाणिकपणे सेवा करत आहे. बँकेचे कार्य अत्यंत प्रशंसनीय असल्या ही सांगून कौतुक केले तसेच त्यांनी पुढील वाटचालीस मनःपूर्वक  शुूभेच्छा दिल्या.
यावेळी बँकेच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला तसेच प्रख्यात शिवव्याख्याते ‘व इतिहास अभ्यासक नितीन बानुगडे पाटील यांचाही सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे मुंबै बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक शिवाजीराव नलावडे, दि हिंदुस्थान बँकेचे चेअरमन गुलाबराव जगताप, बँकिंग तज्ञ श्री. सि. बा. अडसूळ आणि शिवकृपा पतपेढीचे अध्यक्ष गोरख चव्हाण इत्यादी सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.