पडघा: भिवंडी तालुक्यातील पडघे गावातील स्वप्निल डोंगरे हा तरुण दोन वर्षांपूर्वी भारतीय सैन्य दलात दाखल झाला. आठ दिवसापूर्वीच तो रजेवर आला असता भारत पाकिस्तान युद्ध सुरू झाले. त्यामुळे त्याला अत्यावश्यक कॉल आल्याने तो पुन्हा देशसेवेसाठी निघाला आहे.
स्वप्निल डोंगरे हा गेल्या दोन दिवसांपासून आजारी असून सुद्धा त्याने देशसेवेला जाण्याचे व कर्तव्य बजावण्याचे ठरवले आहे. डॉक्टरांकडे उपचार घेत असलेला स्वप्निल हा आज देश सेवेकरता निघतो हे देशप्रेम आहे. शैलेश बिडवी यांच्या कार्यालयात पडघा येथील ग्रामस्थांनी स्वप्निलचा सत्कार करून त्याचे औक्षण करून त्याला ‘विजयी भव’च्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी पडघा ग्रामपंचायतीचे सरपंच रवींद्र विशे, माजी सरपंच शैलेश बिडवी, डॉ.संजय पाटील तसेच विविध नागरिक उपस्थित होते. स्वप्निल सीमेवर जाऊन देशासाठी लढून विजय मिळवून यावा अशी भावना प्रत्येकाने व्यक्त केली.
आजारी असताना सुद्धा स्वप्निल देशसेवेसाठी व आपले कर्तव्य बजावण्यासाठी जात असल्याने पडघा परिसरातील व संपूर्ण तालुक्यातील नागरिकांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.