मोरबे धरणात बुडून तरुणाचा मृत्यू

नवी मुंबई: नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात बुधवारी एक तरुण पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत पावल्याची घटना घडली आहे.

अनिकेत भगत असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव असून तो पनवेल सोलापूर येथील रहिवासी आहे. मात्र सदर घटनेमुळे मोरबे धरणाची सुरक्षा पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.

पनवेलमधील पिल्लइ कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये तिसऱ्या वर्षात शिकत होता. सुकापूर भगतवाडी येथे राहणारा अनिकेत आणि त्याचे मित्र कॉलेजची परीक्षा संपल्यानंतर सुट्टी लागल्याने म्हणून नवी मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाच्या परिसरात आले होते. त्याचे सर्व मित्र पाण्याबाहेर असताना, अनिकेत पोहण्यासाठी पाण्यात उतरला. काही अंतर गेल्यावर त्याला दम लागला आणि दुर्दैवाने तो बुडाला. याबाबत खालापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक नोंद मृत्यूची नोंद झाली असुन पुढील तपास पोलिस करत आहेत.