कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील आय प्रभाग क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले कर्मचारी संतोष पाटणे (५१) यांना बुधवारी ठाणे लाच लुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचून दीड हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे.
महापालिकेच्या आय प्रभागात एका नागरिकाने विवाह नोंदणी दाखला मिळवण्यासाठी अर्ज केला होता. दाखला तत्काळ मिळावा यासाठी त्यांनी महापालिकेच्या आय प्रभागातील नागरि सुविधा केंद्रामध्ये अर्ज केला होता. तो दाखला तत्काळ हवा असल्यास पाटणे यांनी त्यांच्याकडे पैशाची मागणी केली होती.
याबाबत या नागरिकाने ठाणे लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार आज दुपारी महापालिका कर्मचारी पाटणे यांनी सदर नागरिकाकडून दीड हजार रुपयांची मागणी केली होती, मात्र तडजोड केल्यानंतर दीड हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.