निर्माणाधीन इमारतीच्या पार्किंगचा स्लॅब कोसळून पाच मजूर जखमी

कल्याण : कल्याणतील खडकपाडा परिसरात नामांकित विकासकाचे निर्माणाधीन इमारतीच्या पहिल्या माळ्यावरील पार्किंगचा स्लॅब कोसळल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. या घटनेत चार ते पाच मजूर जखमी झाले. उपचारार्थ त्यांना रूग्णालयात नेले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

याचवेळी त्या परिसरातून जात असलेले मनसे वार्ड उपाध्यक्ष श्रुतिक पाटील यांनी प्रसिध्दी माध्यमांना सांगितले की, पार्किंगचा निर्माणाधीन ओला स्लॅब कोसळल्याचा आवाज झाल्याने तिथे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 4 ते 5 मजुरांना मी आणि तिथे काम करणाऱ्या मजुरांनी बाहेर काढले. त्यापैकी काही जणांच्या हाता-पायाला लागले होते. त्यांना तेथील गाडीतून रूग्णालयात नेण्यात आले.