मुख्यमंत्री फडणविस करणार समारोप
ठाणे: ठाण्यात भरविण्यात आलेल्या ३५व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचे उदघाट्न उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे तर समारोप करण्यासाठी १मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ठाण्यात येणार आहेत.
साकेत पोलीस मैदानात २२ फेब्रुवारीपासून क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली होती. प्राथमिक फेरीचे सामने कालपर्यंत झाले आहेत. सायंकाळी ५ वाजता उपमुख्यमंत्री श्री.शिंदे हे उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर या मुख्य स्पर्धांना सुरुवात होणार आहे. राज्यभरातून सुमारे अडीच हजार स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. त्यांची उत्तम सोय ठाणे पोलिसांनी केली आहे. या स्पर्धेत ॲथलेटिक्स, फुटबॉल, व्हॉलीबॉल, हॉकी, हॅन्डबॉल, बास्केट बॉल, खो खो, कब्बड्डी, ज्युडो बॉक्सिंग, कुस्ती, वेटलिफ्टिंग, बॉडी बिल्डिंग, जलतरण आदी १८ क्रीडा प्रकाराचे सामने होणार असून १३ संघातून २३२३ पुरुष आणि ६०६ महिला असे तीन हजार खेळाडू ठाण्यात आले असून त्यांची राहण्याची उत्तम सोय ठाणे पोलिसांनी केली आहे. पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम नियोजन करण्यात आले आहे. १ मार्च रोजी दुपारी मुख्यमंत्री श्री.फडणविस यांच्या उपस्थितीत या स्पर्धांचा सांगता समारोप होणार आहे.