वालधुनी पुलावर धावत्या दुचाकीने घेतला पेट

कल्याण : कल्याणातील वालधुनी पुलावर धावत्या बाईकने गुरूवारी दुपारी पेट घेतल्याची घटना घडली.

या पेट घेतलेल्या बाईकचा वाहतूक पोलिसाने व्हिडीओ काढीत इतर वाहनांची वाहतूक थांबण्याच्या सूचना करीत असल्याचे व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे. उष्णतेचा वाढता चटका आणि त्यात धावत्या बाईकने पेट घेतल्याची घटना यामुळे घाबरलेल्या बाईक चालकाने बाईक तिथेच टाकून पळाल्याचे समजते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.