धक्का लागल्यावरून तीन प्रवाशांवर चाकुने हल्ला

कल्याण : कल्याणवरून दादरला जाणाऱ्या फास्ट लोकलमध्ये ट्रेनमधून उतरण्याच्या वादातून तीन प्रवाशांवर एका प्रवाशाने चाकूने हल्ला केला. हातावर बोटावर चाकूने हल्ला केला, यात अक्षय वाघ, हेमंत कांकरिया, राजेश चांगलानी हे तीन प्रवासी जखमी झाले आहेत.

जखमी प्रवाशांनी कल्याणवरून दादरला जाणारी फास्ट लोकल पकडली. या लोकलमध्ये शेख जिया हुसेन हा 19 वर्षीय प्रवासी डोंबिवली स्थानकात बसला होता. शेख जिया हुसेन याला मुंब्र्यामध्ये उतरायचे होते, मात्र ही लोकल फास्ट असल्याने ती मुंब्र्याला थांबत नाही असे प्रवाशांनी त्याला सांगितले. हुसेन शेख हा उतरण्याचा प्रयत्न करत असताना त्याला एका प्रवाशाचा धक्का लागला आणि वाद सुरू झाला. या वादात जिया शेख याला काही प्रवाशांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.

मात्र जियाने जवळ असलेल्या चाकूने प्रवाशांवर हल्ला केला. यात तीन प्रवासी जखमी झाले. जियाने लोकलमध्ये गोंधळ घातला. आरोपी शेख जिया हुसेन याला डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करत घटनेचा तपास सुरू केला असल्याची माहिती डोंबिवली लोहमार्ग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण उंद्रे यांनी दिली.