महायुतीच्या मंत्र्यांनी कुठेही जनता दरबार घ्यावेत

वनमंत्री गणेश नाईक यांचे प्रतिपादन

ठाणे: महायुतीच्या सर्व मंत्र्यांनी जिकडे पाहिजे तिकडे जनता दरबार घ्यावेत, असे वक्तव्य वनमंत्री गणेश नाईक यांनी केले.

ठाण्यातील वंदे मातरम संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बाप्पाचे दर्शन श्री.नाईक यांनी घेतले. त्यावेळी ते बोलत होते. जनता दरबार म्हणजे लोकांच्या अडीअडचणी समजून घेणे आणि त्या दूर करणे. मी उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री अजित पवार यांना याबाबत सांगितले आहे. महायुतीच्या कोणत्याही मंत्र्याने नवी मुंबईत जनता दरबार घ्यावा, असेही श्री.नाईक यांनी स्पष्ट केले.

यावेळी आयोजक संदीप लेले, माजी नगरसेवक भरत चव्हाण, सागर भदे, रमेश सांगळे, सचिन केदारी, संजय पाटील, ओंकार चव्हाण आदी उपस्थित होते.