ठाणे : दैनिक ठाणेवैभव आणि अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने अखंड वाचन यज्ञ उपक्रमांतर्गत ‘माझे आयडॉल’ कथा स्पर्धेतील जानेवारी महिन्यातील विजेत्यांचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच ‘ठाणेवैभव’च्या कार्यालयात पार पडला.
या प्रसंगी अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि उपक्रमाचे संकल्पनाकार डॉ. योगेश जोशी यांनी प्रास्तविकाच्या माध्यमातून उपक्रमाचा उद्देश सांगितला तर ‘ठाणेवैभव’चे व्यवस्थापकीय संपादक निखिल बल्लाळ यांनी अशा उपक्रमांची सातत्याने गरज असून शाळाशाळांत ते राबविण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. जानेवारी महिन्यातील विजेत्यांसाठी कै.राम नेमाडे यांचे स्मरणार्थ कुसुमताई नेमाडे यांनी पुस्तक स्वरूपात पारितोषिके पुरस्कृत केली. या प्रसंगी अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठानचे सचिव व बालसाहित्यिक हेमंत नेहते आणि राज्य शिक्षक पुरस्कार विजेते प्रा. प्रकाश माळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
पारितोषिक विजेत्यांची नावे
वेद मुकादम-ऐवरशाईन इंग्लिश स्कूल, काल्हेर, दिव्या भारंबे-कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूल, बदलापूर (पूर्व), नक्षत्रा ठाकूर-अहिंसा इंटरनॅशनल स्कूल, विखरण, दोंडाईचा, साई मोरे-ज्ञानामृत विद्यालय, निखिल खानोलकर-उल्हास विद्यालय, मराठा सेक्शन, कुंजल जंगले-के.सी. गांधी-इंग्लिश स्कूल, श्रेया म्हस्के-ज्ञानामृत माध्यमिक विद्यालय, अंबरनाथ, अवनी शिगवान-सेंट जॉन द बॅप्टिस हायस्कूल, ठाणे, वृषाली शिंदे-एस. एम. जी. विद्यामंदिर दिवा-आगासनरोड दिवा (पू), आर्या डोळस-ज्ञानदीप कॉन्व्हेन्ट स्कूल, ईश्वरी जाधव-स्वामी विवेकानंद विद्यामंदिर रामचंद्रनगर, डोंबिवली (पूर्व), सई हुलवळे-गार्डियन हायस्कूल, डोंबिवली, कस्तुरी कारंडे-ज्ञानामृत माध्यमिक विद्यालय, अंबरनाथ, बिलाल शेख-एस. जी. आयडीयल प्रायमरी स्कूल, राबोडी, ठाणे, श्रध्दा बोऱ्हाडे-एस. एम. जी. विद्यामंदिर, दिवा, वेदांत पाटील-ऑल सेंट हायस्कूल, निशिता लोहकरे-ज्ञानदीप विद्यामंदिर, मुंब्रा, मिनाक्षी चव्हाण-स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, डोंबिवली.