लॉटरी बंदी नको सुधारणा हवी: लॉटरी विक्रेत्यांची मागणी

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट लॉटरी विक्रेत्यांच्या प्रतिनिधींनी मंत्रालयात घेतली आणि लॉटरी बंदीला जोरदार विरोध केला. त्यावर विक्रेत्यांच्या भावनांचा सकारात्मक विचार करण्यात येईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी लवकरच चर्चा करण्यात येईल तसेच विक्रेत्यांसोबत राज्य सरकार आहे, असे श्री.पवार यांनी सांगितले. त्यानंतर विक्रेत्यांनी एकच जल्लोष केला.

या निर्णयाविरोधात लॉटरी विक्रेत्यांचे ज्येष्ठ नेते विलास सातार्डेकर यांनी राज्यभर आंदोलन उभे केले आहे. विधान परिषदतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही या प्रश्नी पुढाकार घेऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे लॉटरी विक्रेत्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली होती. या बैठकीला आमदार सुनिल शिदे देखील उपस्थित होते.

प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता, लॉटरी आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, सचिव (लेखा व कोषागरे ) रिचा बागला, उपसचिव (वित्त) मनीषा कामटे आदी अधिकारी तसेच संघटनेचे प्रतिनिधी चंद्रकात मोरे, स्नेहल शहा, मनोज वारंग, दिलीप धुरी, अनुज बाजपेयी, गणेश कदम, राजेश बोरकर, कमलेश विश्वकर्मा, अविनाश सावंत, सिद्धेश पाटील, विजय सामी, महेंद्र गणात्रा, मनिष शहा, महेश गौडा आणि लाॅटरी विक्रेते हजर होते.