वाल्हीवरे आश्रमशाळेतील विद्यार्थ्याची आत्महत्या

मुरबाड : मुरबाड तालुक्यातील वाल्हीवरे आदिवासी अनुदानित आश्रमशाळेतील इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मुरबाड तालुक्यात घडली आहे.

आदिवासी विकास विभागांतर्गत चालवल्या जाणा-या शासकिय अनुदानीत आश्रमशाळा वाल्हिवरे येथील इयत्ता दहावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांने रात्रीच्या सुमारास शाळेलगतच्या झाडाला गळफास लावून आत्महत्त्या केली आहे. हा विद्यार्थी जव्हार तालुक्यातील असल्याचे समजते. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

गेल्यावर्षी बारागाव तळवळी येथील आश्रमशाळेत असाच प्रकार घडला होता. त्यातही बाहेरील तालुक्यातील एक मुलगा दगावला होता. वाल्हिवरे अनुदानीत आश्रमशाळेत केळेवाडी डहाणू, कुंभाळे, कोंबडपाडा, वाल्हिवरे, आवळेवाडी, मोधळवाडी, बांडेशेत, धारखिंड या आदिवासी वस्तीवरील अंदाजे ७०० विद्यार्थी इयत्ता पहिली ते दहावीत शिकत आहेत. सुभाष रावत रा. किनवली कोळीवाडा, डहाणू हा या आश्रमशाळेत दहावीत शिकत होता. शनिवार २ जानेवारी रोजी त्याने गळफास लावून आत्महत्या केली. विद्यार्थ्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे.जे. रूग्णालय, मुंबई येथे पाठवण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.