जानेवारीत आरक्षणही फुल्ल, आतापर्यंत ९००जणांची सफर
नवी मुंबई: ठाणे खाडी किनाऱ्यावरील पाणथळ क्षेत्र हे आता फ्लेमिंगो पक्षांसाठी हक्काचे घर बनल्याने दरवर्षी हिवाळा सुरू होताच हे परदेशी पक्षी मुक्काम ठोकतात. त्यामुळे या पक्षांना जवळून पाहण्यासाठी
ऐरोली येथील सागरी जैवविविधता निसर्ग परिचय केंद्राने फ्लेमिंगो सफर बोट मागील काही वर्षांपासून सुरू केली आहे.
यंदा देखील पक्षीप्रेमी, पर्यटक हे फ्लेमिंगो पक्षी पाहण्यासाठी गर्दी करत असून या सफरीला भरघोस प्रतिसाद लाभत आहे. जानेवारी महिन्यात आतापर्यंत ९००जणांनी बोटिंग सफर केली असून पर्यटक आगाऊ नोंदणी करत असल्याची माहिती वनविभाग अधिकाऱ्यांनी दिली आहे.
नवी मुंबईसह, ठाणे, मुंबईतील पर्यावरण प्रेमींना खाडी किनाऱ्यांचे महत्त्व, जैवविविधतेची माहिती व किनाऱ्यांचे संरक्षण कसे करावे, पक्षीनिरक्षण आणि बोटींग सुरू करण्यात आली आहे.
ठाणे ही आशिया खंडातील सर्वात मोठी खाडी आहे. २६ किलोमीटरच्या खाडी परिसरामध्ये २०० पेक्षा जास्त पक्षी स्थलांतर करीत असतात. फ्लेमिंगोसह अनेक विदेशी पक्षीही खाडी किनाऱ्यावर प्रत्येक वर्षी आश्रयाला येतात.
जानेवारीपासून बोटिंग सुरु करण्यात आली असून आतापर्यंत ९००जणांनी खाडी सफर केली आहे. तसेच जानेवारीमधील संपूर्ण महिन्यात आगाऊ बुकिंग केली आहे, अशी माहिती वनविभाग अधिकाऱ्यांनी दिली आहे.