ठाणे: कोकणचे भाग्यविधाते माजी केंद्रीय मंत्री राज्यसभा खासदार नारायण राणे उद्या बुधवार १५ जानेवारी रोजी ठाण्यात येत आहेत.
ठाण्यातील कोकण ग्रामविकास मंडळ आयोजित मालवणी महोत्सवाला नारायण राणे येत असल्याची माहिती आयोजक सीताराम राणे यांनी दिली.
ठाणे शहरातील शिवाई नगर, उन्नती गार्डन मैदानात कोकण ग्रामविकास मंडळाच्या वतीने “मालवणी महोत्सव २०२५” चे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १९ जानेवारीपर्यंत हा मालवणी महोत्सव सुरू असून या महोत्सवामध्ये भेट देण्यासाठी बुधवारी सायंकाळी ७ वाजता भाजप नेते खा. नारायण राणे येणार आहेत. मालवणी महोत्सवाचे यंदा २६ वे वर्ष असून येथे कोकणातील व्यावसायिक तसेच लघु व कुटीरोद्योगींचे अनेक स्टॉल्स आहेत. या शिवाय कोकणची खाद्य संस्कृतीची रेलचेल मालवणी महोत्सवात आहे.
या पार्श्वभूमीवर कोकणाच्या विकासात मोठे योगदान देणारे नारायण राणे मालवणी महोत्सवात येत असल्याने ते उद्यमी चाकरमान्यांना कोणता कानमंत्र देतात, याची उत्सुकता लागली आहे. नारायण राणे यांच्या स्वागतासाठी मालवणी महोत्सवात जय्यत तयारी करण्यात आली आहे.