उल्हासनगर महापालिकेचे नवीन मुख्यालय होणार १५ मजली

उल्हासनगर: उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त विकास ढाकणे यांनी महापालिकेची नवीन इमारत १५ मजली उभारण्याची योजना आखली असून ही इमारत पिरॅमिड आकाराची असणार आहे. या इमारतीला ४१० कोटीचा निधी लागणार असून इमारतीचे काम सुरु होईल तेव्हा महापालिकेचे कामकाज तात्पुरते प्रांत कार्यालयातील प्रशासकीय इमारतीमध्ये सुरु होणार आहे.

उल्हासनगर महापालिकेची सध्या अस्तित्वात असलेली इमारत ३ जून १९७६ साली बांधली असून तीन मजल्यावर महापालिकेचे कामकाज चालते. दरम्यान उल्हासनगर महानगरपालिका सध्यस्थितीत ही इमारत धोकादायक झाली असल्याने या इमारतीचे पुनर्निमाण होणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन आयुक्त विकास ढाकणे यांनी लवकरात लवकर ही इमारत तोडून त्या जागी पिरॅमिड आकाराची १५ मजली इमारत उभी करण्याची योजना आहे. आर्किटेक्ट हितेन शेट्टी यांनी तयार हा आराखडा तयार केला आहे.

या योजनेसोबत आयुक्त विकास ढाकणे यांनी मिशन-५० चा संकल्प केला आहे. या संकल्पांतर्गत एमएमआरडीएचे ७ काँक्रीटचे रोड मार्च २०२५ पर्यंत पूर्ण होणार आहेत. तर यातील पाच रोडला आकर्षक लुक देण्यात येणार असल्याचे आयुक्तानी सांगितले आहे. महापालिकेची स्वतंत्र पाणी योजना निर्माण करण्यात येणार असून सीमा विस्तार करुन बाजुच्या गावांना महापालिकेत सामाविष्ट करण्यात करण्याचा प्रयत्न, बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलाचे काम पूर्ण करणे, कबड्डी कोचिंग व्यवस्था, महापालिकेची वेबसाईड अपडेट करणे, आदर्श शाळांचा विकास करणे, संपत्ती व्यवस्थापन डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणणे, झोपडपट्ट्यांमध्ये हिरकणी अभ्यासिका सुरु करणे, केबी रोडवर मल्टीलेवल उड्डाणपुल तयार करणे, बॅडमिंटन, टेनिस, आर्चरी, हॉलीबॉल, बास्केटबॉल आदी योजना कार्यान्वित करण्याचा संकल्प आयुक्तांनी जाहीर केला आहे.