ठाणे : ग्रॅण्डमास्टर सी. हनुमंता राव यांच्या स्मरणार्थ 42वी बीकेआय राष्ट्रीय स्पर्धा कर्नाटकातील पुत्तुर येथे पार पडली.
6,7 आणि 8 डिसेंबर रोजी झालेल्या या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये ठाणे येथील बुडोकॉन कराटे अँड स्पोर्ट्स असोसिएशन या संस्थेमधील १७ खेळाडूंनी सहभाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी पार पाडली. त्यांना प्रमुख शिक्षक खंडू इंगोले व प्रशिक्षक हर्षल बरकले यांचे मार्गदर्शन लाभले. या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये खेळाडूंनी कता, कुमिते आणि टीम कता ह्या तीन प्रकारांत सहभाग नोंदवत १७ सुवर्ण १५ रौप्य १६ कांस्य पदके मिळवली. स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याला दुसरा क्रमांक प्राप्त झाला.
आर्या पाटील, मायरा शेख, सानवी आंबेकर, अनिरुद्ध विश्वकर्मा, रुद्र सावंत, प्राण शृंगारे, गार्गी माळकर, वैष्णवी इंगोले, प्रियांका सोनार, सृष्टी चौधरी, केया करकेरा, कार्तिक त्रिपाठी, आयुष धुमाळ, प्रथमेश भिलारे, मयांक नगाने, श्रेष्ठ गुप्ता, नम्रता पाटील या खेळाडूंचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.