राजावाडी क्रिकेट क्लबने माटुंगा जिमखानाचा उडवला धुव्वा

स्वर्गीय अर्जुन मढवी महिला करंडक स्पर्धेच्या पाचव्या आवृत्तीच्या पहिल्या सामन्यात राजावाडी क्रिकेट क्लबने सोमवारी माटुंगा जिमखान्यावर १३१ धावांनी दणदणीत विजय मिळवला.

सेंट्रल मैदानावर नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारताना माटुंगा जिमखान्याने ४० षटकांत २३६ धावा लुटल्या. त्यांना राजावाडी क्रिकेट क्लबचे फक्त पाच विकेट घेण्यात यश आले, त्यापैकी लेगस्पिनर त्रिशा परमारने दोन (२/३२) काढले. दुसरीकडे राजावाडी क्रिकेट क्लबसाठी क्षमा पाटेकर (६३) आणि निविया आंब्रे (५५) यांनी शानदार अर्धशतके झळकावली. तसेच पाटेकर आणि आंब्रे या चमकदार जोडीने चौथ्या विकेटसाठी ११९ धावांची भागिदारी करत त्यांच्या संघाला २०० पार नेले.

प्रत्युत्तरात माटुंगा जिमखानाचा डाव ३३ षटकांत १०५ धावांत आटोपला. रेनी फर्नांडिस (२७) हिने सर्वाधिक धावा केल्या. तिच्या व्यतिरिक्त गार्गी बांदेकर (१७) आणि तिशा नायर (नाबाद १७) या केवळ दोन फलंदाज होत्या ज्यांने दोन अंकी धावसंख्या गाठली. बॅटप्रमाणेच राजावाडी क्रिकेट क्लबसाठी पुन्हा पाटेकर-आंब्रेची जोडीने चेंडूने गाजली. उजव्या हाताची वेगवान गोलंदाज पाटेकर (२/२०) आणि ऑफस्पिनर आंब्रे (२/२१) यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. तसेच, वैष्णवी पोतदार (२/२२) आणि तनिषा धनावडे (२/२१) यांनीही माटुंगा जिमखान्याच्या फलंदाजीचे कंबरडे मोडून दोन विकेट्स घेतल्या.

या पराभवानंतर माटुंगा जिमखानाचा प्रवास या स्पर्धेत संपला आहे. तर राजावाडी क्रिकेट क्लबने पुढच्या टप्प्यात आगेकूच केली आहे.