मिळवा नेटवर्किंगमधून संधींचा शोध
ठाणे: नेटवर्किंगच्या माध्यमातून नवीन संधींचा शोध घेण्याकरिता उन्नती २०२४ या ठाण्यातील सर्वात मोठ्या बिझनेस नेटवर्किंग संघटनेने व्यावसायिक ग्रँड बिझनेस मेळा आयोजित केला आहे.
हा मेळा २९, ३० नोव्हेंबर आणि १ डिसेंबर रोजी संध्याकाळी ४ पासून टीएमसी ग्राउंड, हिरानंदानी इस्टेट, ठाणे (प) येथे भरवण्यात येणार आहे. उन्नती २०२४ मध्ये ११०हून अधिक व्यावसायिकांचे स्टॉल्स, अत्याधुनिक जर्मन टेन्टमध्ये नेटवर्किंग इव्हेंट्स, व्यावसायिक आणि उद्योजकांसोबत कनेक्ट होण्यासाठी नेटवर्किंग लाउंज, संपूर्ण कुटुंबासाठी विविध प्रकारचे खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, मुलांसाठी खास प्ले लाउंज आणि ३० तारखेला रोटरी क्लब्स आणि इनरव्हील क्लब यांच्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबीर आयोजित केले आहे.
२९ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता ब्रिगेडियर भसीन यांचे ‘तुमचं नेतृत्व वाढवा, व्यवसाय वाढवा’ विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान, संध्याकाळी ४.३० वाजता चांदनी जाफ्री यांचे लिगसी निर्माण करा-युनिकॉर्न व्यवसाय उभारण्यासाठी विचार कसा करावा? या विषयावर व्याख्यान, ६.३० वाजता मानसी लाल शर्मा यांचे ‘व्यवसायाची प्रतिमा उभारण्याचे मार्ग’ विषयावर तर ७.३० वाजता विनीत एमडी यांचे फायर-साइड चर्चा : व्यवसाय वृद्धीसाठी मार्गदर्शनपार व्याख्यान आयोजित केले आहे.
३० नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता निमेश मेहता यांचे सेल्स बूस्टर, ४.३० वाजता जेरिन वेनाड (सिटी फ्लो) यांचे जुळवून घेत पुढे जा-व्यवसायात सुसंगत राहण्याचा मुख्य मार्ग, संध्याकाळी ६.३० वाजता काजल कोठारी यांचे आधुनिक मार्केटिंग ट्रेंड्स, ७.३० वाजता डॉ. महाजन यांचे स्वप्न ते वास्तव प्रवास या विषयावर व्याख्यान होणार आहे.
नवीन व्यावसायिक संधींचा शोध घेण्याकरिता, मौल्यवान व्यावसायिक संबंध निर्माण करण्याकरिता, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांकडून शिकण्याची संधी या मेळ्यात मिळणार आहे. उद्योजक, व्यावसायिक किंवा व्यवसायवृद्धीबाबत जिज्ञासू असणाऱ्यांसाठी उन्नती 2024 प्रगतीचा मार्ग आहे. हा मेळा पूर्णतः मोफत असून उन्नती २०२४ साठी ‘ठाणेवैभव’ माध्यम प्रायोजक आहे.