* सर्वाधिक वाढ डोंबिवलीमध्ये १५टक्के
* सर्वाधिक कमी वाढ भिवंडी पूर्व, मुंब्रा-कळवा आणि मीरा-भाईंदरमध्ये
ठाणे : राज्य सरकारने राबवलेल्या लोकप्रिय योजना आणि जिल्हा प्रशासनाने राबवलेले विविध उपक्रम यामुळे यंदा मतदारांमध्ये गत निवडणुकीपेक्षा अधिक उत्साह पाहायला मिळाला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातील १८ मतदारसंघांत ४९.०२ टक्के तर यंदा ५६.४५टक्के मतदान झाले.
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी ग्रामीण मतदारसंघात या निवडणुकीत 69.01टक्के (२०१९ मध्ये ५९.७४), शहापूरमध्ये 68.32 टक्के (६५टक्के), भिवंडी पश्चिममध्ये 54.10 टक्के (50.34 टक्के), भिवंडी पूर्वमध्ये 49.20टक्के (४७.९० टक्के), कल्याण पश्चिममध्ये 54.75 टक्के 41.91टक्के), मुरबाडमध्ये 64.92टक्के (58.53टक्के), अंबरनाथमध्ये 47.75 टक्के (42.46टक्के), उल्हासनगरमध्ये यंदा 54 टक्के (46.99टक्के), कल्याण पूर्वमध्ये 58.50टक्के (43.70टक्के), डोंबिवलीमध्ये 56.19 टक्के ( 40.82टक्के), कल्याण ग्रामीणमध्ये 57.81 टक्के (46.58टक्के), मीरा-भाईंदरमध्ये 51.76 टक्के (48.41टक्के), ओवळा-माजिवडामध्ये 52.25 टक्के (43.08टक्के), कोपरी-पाचपाखाडीमध्ये 59.85टक्के (49.20टक्के), ठाणे शहर मतदारसंघात यंदा 59.01टक्के (52.77टक्के), मुंब्रा-कळवामध्ये 55.08टक्के (50.08टक्के), ऐरोलीमध्ये 50.5 टक्के (42.57टक्के) आणि बेलापूर मतदारसंघात यंदा 55.24 टक्के (मागील निवडणुकीत 45.23टक्के) मतदान झाले.
जिल्ह्यात यंदा साडेसात टक्के मतदान वाढले असून सर्वाधिक १५टक्के मतदान डोंबिवली मतदारसंघात वाढले आहे. तर सर्वात कमी वाढ भिवंडी पूर्व मतदारसंघात एक टक्का, मुंब्रा-कळवा मतदारसंघात दोन टक्के तर मीरा-भाईंदर आणि शहापूर मतदारसंघांमध्ये प्रत्येकी तीन टक्के वाढ झाली आहे.