ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत २८ कोटींचा मुद्देमाल जप्त

ठाणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात व ठाणे जिल्ह्यात भारत निवडणूक आयोगामार्फत आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

आचारसंहिता काळात नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात प्रशासनामार्फत कठोर कारवाई करण्यात येते. या अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघांमधून 18 नोव्हेंबर 2024 पर्यंत एकूण 28 कोटी 7 लाख 13 हजार रुपयांचा मुद्देमाल प्रशासनाकडून जप्त करण्यात आला आहे.

यामध्ये 15 कोटी 59 लाख 4 हजार रोख रक्कम, 3 कोटी 32 लाख 34 हजार रुपये किंमतीचा मद्यसाठा, 1 कोटी 80 लाख 32 हजार रुपये किंमतीचे अंमली पदार्थ, 23 लाख 26 हजार रुपये किंमतीच्या मौल्यवान वस्तू / दागिने आणि 7 कोटी 12 लाख 17 हजार रुपये किंमतीचे मोफत वाटपाचे / इतर साहित्य ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघांमधून प्रशासनाकडून जप्त करण्यात आले आहे.