ठाणे : निवडणुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री १० नंतर प्रचार रॅली काढून आचारसंहिता भंग केली असून निवडणूक आयोग कधी कारवाई करणार असा सवाल महाविकास आघाडीचे शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार केदार दिघे यांनी उपस्थिती केला आहे.
आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी रात्री दहानंतर सर्व प्रचार यंत्रणा कामाला लावून आचारसंहितेचा भंग केला आहे. त्यांना सर्व माफ आहे का असा सवाल केदार दिघे यांनी उपस्थित केला आहे. काल मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी संध्याकाळी ५ वाजता प्रचाराला वागळेमधून सुरुवात केली होती. रात्री दहा वाजता त्यांचा ताफा पूर्व ठाण्यात पोहचला होता. सिद्धार्थ नगर येथे फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली होती. पुढे अष्टविनायक चौक, पारशीवाडी कोपरी गाव या भागातून प्रचार फेरी रात्री 11वाजता आनंदनगर गांधीनगर येथें पोहचली होती. मुख्यमंत्री श्री.शिंदे यांचा सुरक्षा ताफा आणि कोपरीचे पोलिस देखिल त्यांच्या सोबत होते. सुमारे २० ते २५ गाड्या आणि दुचाकी वाहने या ताफ्यात होते. पोलिसांनी देखिल प्रचार फेरीला विरोध केला नाही, असा आरोप श्री. दिघे यांनी करून आचारसंहिता भंग करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक आयोग कधी गुन्हा दाखल करणार असा सवाल उपस्थित केला आहे.