ठाणे : मनसेच्या दोन शिलेदारांसह शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार केदार दिघे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून मनसेचे सुशांत सूर्यराव तर ओवळा-माजिवडे विधानसभा मतदार संघातून संदिप पाचंगे यांनी शक्तीप्रदर्शन करून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यावेळी ठाणे शहर मनसे अध्यक्ष रविंद्र मोरे उपस्थित होते. कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे केदार दिघे यांनी साधेपणाने उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी खासदार राजन विचारे, ठाणे शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुहास देसाई उपस्थित होते.