ठाणे: गेल्या पाच वर्षांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उत्पन्न दहा लाखांनी कमी झाले असून त्यांची जंगम मालमत्ता दीड कोटी इतकी असून शेतीमधून उत्पन्न मिळत असल्याचे शपथपत्रानुसार स्पष्ट झाले आहे.
कोपरी-पाचपाखाडी मतदार संघातून सलग चार वेळा आमदार म्हणून एकनाथ शिंदे निवडून आले आहेत. एकनाथ शिंदे यांनी आज पाचव्यांदा आपल्या उमेदवारीचा अर्ज दाखल केला. त्यांचे वय सध्या ६० वर्षे असून शिक्षण बी.ए. पर्यंत झाले असल्याचे दाखविण्यात आले आहे. शिंदे यांचे २०१९ साली ४४ लाख ८१ हजार ८० इतके उत्पन्न होते, ते दहा लाखांनी कमी होऊन ३४ लाख ८१,१५० इतके झाले आहे. श्री.शिंदे यांची जंगम मालमत्ता एक कोटी ४४लाख इतकी असून त्यांची पाच हेक्टर इतकी शेतजमिन आहे तर शिंदे यांच्यावर १८ गुन्हे दाखल आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या पत्नीचे उत्पन्न दहा लाखांनी वाढले आहे. त्यांच्या नावावर २२ कोटी ८५ लाख ५०,९९५ एवढी संपत्ती आहे. तर दोघांच्या नावावर १५ कोटी ८८ लाखांचे कर्ज आहे.