अंबरनाथमधून राजेश वानखेडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

अंबरनाथ  : अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातून महाआघाडीतर्फे राजेश वानखेडे शिवसेना (उबाठा) तर्फे आज निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.

राजेश वानखेडे यांना शिवसेना (उबाठा) तर्फे उमेदवारी मिळाली. आज सोमवारी निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत जोशी यांच्याकडे वानखेडे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष सदाशिव पाटील, कैलास तेजी, काँग्रेसचे रोहित साळवे, अंजली राऊत आदी पदाधिकारी उपस्थित होते.

उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी उमेदवार वानखेडे यांनी अंबरनाथच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून तहसीलदार कार्यालयापर्यंत शक्तीप्रदर्शन करून अर्ज सादर केला. राखीव असलेल्या मतदारसंघात अंबरनाथ शहर, ग्रामीण आणि उल्हासनगर महानगरपालिका हद्दीतील १७ प्रभागांचा समावेश आहे.