शहापूर: शहापूर विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांना पक्षाने अधिकृत उमेदवारी जाहीर केली असून मंगळवारी 29 तारखेला ते महाविकास आघाडीतून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
महाविकास आघाडीतील शहापूर मतदार संघाचा तिढा सुटला असून हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या व पक्षाच्या वाट्याला गेली आहे. लोकसभेला या मतदारसंघात जातीचे राजकारण झाले नसते तर महाविकास आघाडी प्रथम स्थानावर राहिली असती. दरम्यान महाविकास आघाडी विरोधकांना घाम फोडण्याची शक्यता आहे. आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना मिळून प्रस्थापित उमेदवारासमोर यावेळी भक्कम आव्हान उभे ठाकले आहे.