ठाणे : ‘बुलेट ट्रेन’च्या ‘स्मार्ट प्रकल्पांतर्गत ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट (टीओडी) स्थानकांभोवती सुलभता सुधारण्यासाठी महाराष्ट्रातील ठाणे आणि विरार यासह गुजरातमधील साबरमती आणि सुरत या चार स्थानकांची निवड राज्य सरकारने केली आहे.
मुंबई-अहमदाबाद ‘बुलेट ट्रेन कॉरिडॉर’वरील प्रत्येक स्थानकाच्या डिझाइनमध्ये ते ज्या शहरात येत आहे, त्या शहराच्या भावनेचे प्रतिबिंब उमटणार आहे. यामुळे स्थानिक जनतेशी तत्काळ संपर्क निर्माण करेल आणि भारतातील पहिल्या हाय-स्पीड प्रणालीविषयी अभिमानाची आणि आपलेपणाची भावना निर्माण करेल.
रेल्वे, मेट्रो, बस, टॅक्सी आणि ऑटो अशा इतर माध्यमांशी एकरूप होऊन स्थानकापर्यंत आणि ये-जा करण्यासाठी अलाइनमेंटवरील स्थानके ट्रान्सपोर्ट हब म्हणून विकसित केली जातील. अशा ‘इंटरफेस’मुळे प्रवासाचा वेळ कमी होईल, सुलभता वाढेल आणि सार्वजनिक वाहतुकीच्या वापरालाही प्रोत्साहन मिळेल,ज्यामुळे आपल्या शहरांमध्ये गर्दी आणि उत्सर्जन कमी होईल.