कल्याण : कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात अपक्ष निवडणूक लढविण्याचा इशारा शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी दिल्यानंतर त्याचे पडसाद महायुतीमध्ये उमटत असून महेश गायकवाड यांना मुख्यमंत्र्यांनी समज देण्याची मागणी भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केली आहे.
महेश गायकवाड यांची पक्षाच्या वतीने समज काढली गेली पाहिजे, महायुतीमध्ये अशाप्रकारे कोणी प्रतिक्रिया दिली नाही पाहिजे. मागच्यावेळी अरविंद मोरे यांनी प्रतिक्रिया दिली, आज महेश गायकवाड यांनी दिली. यामुळे महायुतीचे वातावरण दूषित होत आहे. आज परिस्थिति खूप चांगली आहे. महायुतीचे सर्व आमदार निवडून येण्याची परिस्थिति असताना अशा प्रकारे विधान करणं, प्रतिक्रिया देणं चुकीचं असून खासदार श्रीकांत शिंदे अथवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना सांगितल्यास महेश गायकवाड महायुतीचा धर्म पाळतील, अशी प्रतिक्रिया माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिली.
महेश गायकवाड यांचा भाजपला विरोध नाही, गणपत गायकवाड सोडून दुसरा कोणताही उमेदवार असला तर त्यांचा पाठिंबा आहे. मात्र महेश गायकवाड यांना पक्षाकडून समज देण्यात येईल अशी प्रतिक्रिया शिवसेना जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी दिली.