४४१ मतदान केंद्रांवर पार पडणार मतदान प्रक्रिया
कल्याण : कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ निवडणूकीची मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली असून त्यानुसार आजमितीस मतदारांची संख्या चार लाख 34,928 इतकी आहे. यापैकी पुरुष मतदार दोन लाख 28,788 व स्त्री मतदार दोन लाख 6,125 व इतर मतदार 15 इतके आहेत.
कल्याण पश्चिम विधानसभा संघामध्ये 137 लोकेशनवर एकूण 441 मतदान केंद्रे असून आहेत. तसेच चार सहायकारी मतदान केंद्राचा प्रस्ताव मंजुरीकरीता जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्यात आला असल्याची माहिती कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघ निवडणूक निर्णय अधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी तहसीलदार सचिन शेजाळ उपस्थित होते.
कल्याण पश्चिम विधानसभा मतदार निवडणूकीच्या संपूर्ण कालावधीमध्ये आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे आणि आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी 8-8 तसांच्या 3 सत्रामध्ये अहोरात्र (24×7) सनियंत्रण ठेवणेकरिता 9 फ्लाईंग स्क्वॉड, 9 स्टॅटीक सर्वेलन्स टीम, 6 व्हिडीओ निरीक्षण पथके तयार करणत आलेली आहेत.
मतदानाचे साहित्य वाटप व मतदान झाल्यानंतर सर्व साहित्य हे विधानसभा मतदार संघामध्ये जमा करुन पोलिस बंदोबस्तामध्ये विधानसभा कार्यालयातील स्ट्रॉंग रुममध्ये ठेवण्यात येणार आहे. कल्याण पश्चिम विधानसभेची स्टॅाग रुम ही मुंबई विद्यापीठ सबसेंटर येथे असून याच ठिकाणी मतमोजणी देखील होणार आहे.
तसेच शासनाकडून व निवडणूक विभागाकडून जास्तीत जास्त मतदारांनी घराबाहेर पडून मतदान करावे यासाठी जनजागृतीच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी मागिल निवडणुकी पेक्षा चांगला प्रतिसाद देऊन 52टक्के मतदान झाले. विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा यासाठी आवाहन करण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 85 वर्ष वयावरील ज्येष्ठ नागरीकांना व 40 टक्के पेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या मतदाराकरीता गृह मतदानची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे निवडण्क कर्तव्यावर असलेल्या कर्मचा-यांकरीता व अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणा-या मतदारांकरीता टपाली मतदानाची सुविधा करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयातील कंट्रोलरुमचा टोल फ्री क्रमांक 18002330117 असा असून 24 तास सेवा उपलब्ध असणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी दिली.