शिवनगरी मंडळाची ‘कोकणातील गणेशोत्सव’ सजावट अव्वल

शिवसेना गणेशदर्शन स्पर्धा कल्याण विभाग

ठाणे: शिवसेना ठाणे जिल्हा गणेश दर्शन स्पर्धेत कल्याण विभागात मोहने येथिल शिवनगरी मंडळाने बाजी मारली आहे. मंडळाने कोकणातील पारंपरिक गणेशोत्सव या विषयावर सजावट केली आहे.

कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खा नरेश म्हस्के यांनी आज कल्याण विभागाचा निकाल जाहीर केला आहे त्यानुसार शिवनगरी मित्र मंडळाला प्रथम क्रमांक मिळाला आहे. द्वितीय क्रमांक सुभेदार वाडा मित्र मंडळाला मिळाला आहे तर कसरहाट येथिल श्रीमती बाळ गणेश मंडळाला तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. टिटवाळा येथिल हरिओम व्हॅली मंडळाला उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले आहे.

रामबाग येथिल त्रिमूर्ती मित्र मंडळाच्या मूर्तिकाराला पहिले पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. दुसरे बक्षीस कसरहाट येथिल त्वष्ठा मित्र मंडळाच्या मूर्तीला मिळाले आहे. अहिल्याबाई चौक येथिल उत्सवातील मूर्तिकाराला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. उत्तेजनार्थ पारितोषिक बेतूरकर पाडा येथिल मित्र मंडळाच्या मूर्तीला मिळाले आहे.

मागील काही दिवस विविध विषयातील तज्ज्ञ परीक्षकांनी ठाणे आणि कल्याण या भागातील या देखाव्याची पाहणी करून हे निकाल तयार केले होते. ठाण्याचा निकाल यापूर्वीच जाहीर करण्यात आला आहे.

शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने विलास जोशी, ज्ञानेश्वर गायकवाड, अनिल भोर आणि प्रमोद बनसोडे यांनी या स्पर्धेचे योग्य नियोजन केले होते.