ठाण्यातील कोंडी फोडण्यासाठी १२ हजार कोटींची कामे

एमएमआरडीएकडे सहा कंपन्यांच्या २५ निविदा

ठाणे : ठाणे महानगरातील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या आठ पायाभूत प्रकल्पांसाठी सहा कंपन्यांनी 25 निविदा दाखल केल्या आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने या प्रकल्पांच्या तांत्रिक निविदा खुल्या केल्या आहेत.

ठाण्यातील प्रकल्पांच्या तब्बल 12 हजार कोटी रुपयांच्या कामांसाठी मार्चमध्ये निविदा मागविल्या होत्या. त्यामध्ये पूर्व द्रुतगती महामार्गाचाही विस्तार करण्यासाठी छेडानगर ते ठाणे उन्नत मार्ग तसेच पुढे आनंदनगरपर्यंत उन्नत मार्गांची उभारणी करण्याचे प्रकल्प हाती घेतले आहेत.

ठाण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ठाणे आणि भिवंडी खाडी व पुलांची उभारणी केली जाणार आहे. सहा प्रकल्पांच्या निविदा तांत्रिक कारणांमुळे जूनमध्ये रद्द केल्या होत्या तसेच त्या प्रकल्पांच्या पुन्हा नव्याने निविदा काढल्या होत्या.आता या प्रकल्पांच्या तांत्रिक निविदा अलीकडेच उघडण्यात आल्या आहेत. त्यामध्ये चार कंपन्यांनी 25 निविदा भरल्याचे समोर आले आहे आणि येत्या महिनाभरात निविदा अंतिम करून कंत्राटदारांनाही कार्यादेश देण्याची शक्यता आहे,असे प्राधिकरणातील सूत्रांनी सांगितले. तसेच भूमीपूजनही करण्याचा ‘एमएमआरडीए’चा प्रयत्न आहे आणि त्यादृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.

आनंदनगर ते साकेत उन्नत मार्ग अशोका बेडकॉन, जे कुमार, इन्फ्रा प्रोजेक्ट, नवयुगा इंजीनियरिंग कंपनीने सोळाशे कोटी रुपये गुंतवले आहेत. याशिवाय पूर्व द्रुतगती मार्गाचा विस्तार प्रकल्प छेडानगर येथून ठाण्यापर्यंत करण्यात येणार आहे. ऑपकोन्स इंट्रास्ट्रक्चर इन्फ्राटेक, अशोका बिल्डकॉन, नवयुगा इंजिनिअरिंग कंपनी मिळून 1453 कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे.
कोलशेत ते भिवंडीतील कळवे खाडीपूल आदी प्रकल्पांसाठी तीन कंपन्यांनी 274 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे आणि एनएचफोर ते काटई नाका उन्नत मार्गासाठी अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर आदी कंपन्यांनीही 187 कोटी रुपये गुंतवले आहेत. शिवाय, कल्याण-मुरबाड रोड ते बदलापूर ते पुणे लिंक रोड ते वालधुनी नदी, कर्जत ते कसारा रेल्वे मार्गावरून रस्ता अशोका बिल्डकॉन बांधण्यात येणार आहे, अशी माहिती प्राधिकरणातील सूत्रांनी दिली.

‘गायमुख ते पायेगाव खाडी पुलासाठी ऑपकोन्स इन्फ्रास्ट्रक्चर,बअशोका बिल्डकॉन, नवयुगा इंजिनिअरिंग कंपनी मिळून 929 कोटी रुपये येथे काम करणार आहे. बाळकूम ते गायमुख सागरी मार्ग, असकॉन्स इंट्रास्ट्रक्चर, नवयुगा इंजीनियरिंग कंपनी आदी 2597 कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे,असेही सांगण्यात आले.