पंजाब येथील अधिवेशनाला शहापुरातील ओबीसी बांधव रवाना

शहापूर : राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे 9 वे राष्ट्रीय अधिवेशन 7 ऑगस्टला पंजाबमधील अमृतसरच्या गुरूनानक देव विद्यापीठाच्या गोल्डन ज्युबिली कन्व्हेन्शन सेंटरमध्ये सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आले आहे.

या अधिवेशनासाठी शहापूर तालुक्यातून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रकाश भांगरथ, तालुकाध्यक्ष अनिल निचिते, वसंत भेरे, बाळासाहेब खारीक, मधुकर शिंदे, दशरथ ठाकरे, किसन भेरे, मल्हारी विशे, जयवंत मोगरे, विष्णू शेलवले, गुरुनाथ ठाकरे, बबन भेरे, विश्वास घावट, गजानन निचीते, धनेश भेरे, मोरेश्वर गगे, सिद्धांत भांगरथ, श्रीराम पष्टे व सुरेश कापरे आदी पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्ते रवाना झाले.

या अधिवेशनात ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना, ओबीसी क्रिमिलेअर मर्यादावाढ, स्वतंत्र ओबीसी मंत्रालय, आरक्षणासाठी 50 टक्क्यांची अट रद्द करणे, ओबीसी विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप तसेच विद्यार्थी हॉस्टेल आणि लोकसभा विधानसभेमध्ये ओबीसी आरक्षण यासह समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या अनुषंगाने मंथन होणार आहे.

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ.बबनराव तायवाडे यांच्या अध्यक्षतेखाली हे अधिवेशन होणार असून आमदार व खासदार या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. तसेच महाराष्ट्रातील जवळपास सात हजार पदाधिकारी या अधिवेशनात उपस्थित राहणार असून मुंबई-कोकण विभागातून हजारो कार्यकर्ते दाखल होणार असल्याची माहिती डॉ.भांगरथ यांनी दिली.