पुणे : संततधार पावसामुळे पुणे ग्रामीण पोलीस दलात आयोजित करण्यात आलेली मैदानी चाचणी स्थगित करण्यात आली होती. मैदानी चाचणीचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, २९ जुलै ते ५ ऑगस्ट दरम्यान ही चाचणी होणार आहे.
पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस दलातील रिक्त असलेल्या पोलीस शिपाई पदाच्या ४४८ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. मैदानी चाचणी ९ ते २७ जुलै या कालावधीत घेण्यात येणार होती. मात्र, संततधार पावसामुळे मैदानी चाचणी स्थगित करण्यात आली. ग्रामीण पोलिसांनी मैदानी चाचणीचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. सुधारित वेळापत्रकानूसार उमेदवरांनी आपल्याला महाआयटी विभाग, मुंबई यांचेकडून देण्यात आलेले पूर्वीच्या तारखेचे प्रवेशपत्र घेऊन मैदानी चाचणीसाठी नव्याने देण्यात आलेल्या तारखेस सकाळी पाच वाजता हजर रहावे, असे आवाहन पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी केले आहे.
ग्रामीण पोलीस मैदानी चाचणी नवीन वेळापत्रक
पुर्वीची तारीख नवीन तारीख
९, १० जुलै २९ जुलै
११ जुलै ३० जुलै
१२ जुलै ३१ जुलै
१३ जुलै १ ऑगस्ट
१५ जुलै २ ऑगस्ट
२५ जुलै ५ ऑगस्ट